CA vs CS difference : सीए आणि सीएसमध्ये काय फरक आहे? कोणाला मिळतो जास्त पगार?

सरकारनामा ब्यूरो

CA आणि CS मध्ये काय फरक आहे

बारावीनंतर अनेक विद्यार्थ्यी वाणिज्य शाखा निवडतात आणि पदवीनंतर सीए किंवा सीएस परीक्षेची तयारी सुरू करतात, तर जाणून घेऊयात CA आणि CS म्हणजे काय आणि या दोन्हीमध्ये काय फरक आहे.

CA vs CS difference | Sarkarnama

सीए

सीएला संक्षिप्त भाषेत चार्टर्ड अकाउंटंट असं म्हणतात. हे वित्त, लेखा, कर आणि लेखापरीक्षण या क्षेत्रामध्ये एक्सपर्ट असतात.

CA vs CS difference | Sarkarnama

सीएस

सीएसला संक्षिप्त भाषेत कंपनी सचिव म्हणतात. जे कॉर्पोरेट कायदा, प्रशासन आणि कंपनीच्या कायदेशीर गोष्टीमध्ये एक्सपर्ट असतात.

CA vs CS difference | Sarkarnama

अभ्यासक्रमांचा कालावधी?

सीए आणि सीएसच्या अभ्यासक्रमांचा कालावधी खूप वेगवेगळा आहे. सीएसचा कोर्स पूर्ण करण्यासाठी 2 ते 3 वर्षे लागतात, तर चार्टर्ड अकाउंटंट कोर्ससाठी 5 वर्षाचा कालावधी लागतो.

CA vs CS difference | Sarkarnama

कोणती कामे केली जातात?

कर नियोजन, ऑडिटिंग, बजेट व्यवस्थापन आणि आर्थिक फाइनेंशियल कंसल्टिंगचे काम सीएमध्ये केले जाते, तर सीएसमध्ये कंपनीच्या कायदेशीर प्रक्रिया, प्रशासन, बोर्ड बैठका आणि अनुपालन ठरविणे अशी कामे केली जातात.

CA vs CS difference | Sarkarnama

सीएचा अभ्यासक्रम

सीए करण्यासाठी विद्यार्थ्यांना बारावी नंतर फाउंडेशन कोर्स, त्यानंतर इंटरमिजिएट आणि अंतिम परीक्षा पास करणे आवश्यक असते. तसेच ३ वर्षांचा आर्टिकलशिप अनिवार्य आहे.

CA vs CS difference | Sarkarnama

सीएसचा अभ्यासक्रम

सीएस परीक्षेसाठी बारावी केल्यानंतर फाउंडेशन प्रोग्राम, आणि त्यानंतर एक्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनल प्रोग्राम असा अभ्यासक्रम असतो यानंतर, व्यावहारिक प्रशिक्षण घेणे आवश्यक असते.

CA vs CS difference | Sarkarnama

कोणाला जास्त वेतन असते?

सीए केल्यानंतर विद्यार्थांना सुरुवातीचे वेतन हे दरवर्षी 8 ते 12 लाख रुपये असते. अनुभवानुसार हे वेतन यापेक्षाही वाढते. तर, सीएस केल्यानंतर सुरुवातीचे वेतन दरवर्षी 5 ते 8 लाख रुपये इतके असते जसजसा अनुभव वाढत जातो तसतसे पुढे पॅकेजही वाढते.

CA vs CS difference | Sarkarnama

कोणाला जास्त संधी उपलब्ध?

आंतरराष्ट्रीय स्तरावर म्हणजेच मुख्यता बहुराष्ट्रीय कंपन्या आणि वित्त कंपन्यांमध्ये सीएसाठी खूप संधी उपलब्ध असतात, तर भारतातील प्रामुख्याने कॉर्पोरेट क्षेत्रात सीएससाठी जास्त मागणी आहे.

CA vs CS difference | Sarkarnama

NEXT : मुख्यमंत्र्यांचे 'हे' पीए झाले आमदारकीचे लाभार्थी !

येथे क्लिक करा...