One Nation, One Election : मोदी सरकारची 'एक देश, एक निवडणूक' संकल्पना ; काय आहेत शिफारशी?

Rashmi Mane

देशातील सर्व निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या 'एक देश, एक निवडणूक' रामनाथ कोविंद समितीचा अहवाल आज (बुधवारी) मोदी सरकार मधील मंत्रिमंडळाने मंजूर केला.

One Nation, One Election | Sarkarnama

कधी स्थापन करण्यात आली ही समिती

मोदी सरकारने आपल्या मागील कार्यकाळात 'वन नेशन, वन इलेक्शन' या विषयावर माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली 2 सप्टेंबर 2023 ला समिती स्थापन केली होती.

One Nation, One Election | Sarkarnama

समितीकडे कोणती जबाबदारी ?

देशात एकाचवेळी निवडणुका घेण्याच्या शक्यतांचा अहवाल देण्याची जबाबदारी कोविंद समितीला देण्यात आली होती.

One Nation, One Election | Sarkarnama

समितीने कधी सादर केला अहवाल?

या समितीने मार्चमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आपला अहवाल सादर केला होता.

One Nation, One Election | Sarkarnama

कॅबिनेट निर्णय

मोदी मंत्रिमंडळाच्या बैठकीत या अहवालावर चर्चा होऊन तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे.

One Nation, One Election | Sarkarnama

गृहमंत्री शाह यांचे वक्तव्य

काही काळापूर्वी शाह यांनी या सरकारच्या कार्यकाळात 'वन नेशन, वन इलेक्शन' लागू करण्याबाबत बोलले होते.

One Nation, One Election | Sarkarnama

समितीच्या शिफारशी काय आहेत?

पहिल्या टप्प्यात लोकसभेसोबत सर्व राज्यांच्या विधानसभा निवडणुका घ्याव्यात. तसेच दुसऱ्या टप्प्यात लोकसभा आणि विधानसभेसोबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात.

One Nation, One Election | Sarkarnama

एकच मतदार यादी

संपूर्ण देशातील सर्व निवडणुकांसाठी एकच मतदार यादी असावी आणि मतदार ओळखपत्र सर्वांसाठी समान आहे असावे.

One Nation, One Election | Sarkarnama

Next : 'CM' पदाचा राजीनामा दिल्यानंतर केजरीवालांना कोणत्या सुविधा मिळणार?

येथे क्लिक करा