Rashmi Mane
आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी (17 सप्टेंबर) दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.
केजरीवाल यांनी उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांच्याकडे राजीनामा सूपूर्द केला. मुख्यंमत्रीपदासाठी दिल्लीच्या शिक्षण मंत्री आणि ‘आप’च्या नेत्या आतिशी मार्लेना यांच्या नावाची घोषणा केली.
मात्र, अरविंद केजरीवाल यांना राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून मिळणाऱ्या सोयी-सुविधांवर पाणी सोडावे लागणार आहे.
केजरीवाल यांना कोणत्या सुविधा सोडाव्या लागतील आणि त्यांचे वेतन आणि भत्ते किती कमी होतील...जाणून घेऊया...
केजरीवालांना सोडाव्या लागणाऱ्या सुविधांमध्ये मुख्यमंत्र्यांचा बंगला, गाडी, सुरक्षा, पगार, अनेक भत्ते आदींचाही समावेश आहे.
मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आमदार म्हणून 90 हजार रुपये वेतन दरमहा मिळेल.
अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री म्हणून कोणतीही सुविधा मिळणार नाही. मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर ते मंत्री नसतील तर त्यांना फक्त आमदाराला मिळणारे वेतन, भत्ते आणि सुविधा मिळतील.
राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षांना सरकारी निवासस्थान दिले जाते, त्यासोबत इतर काही सुविधाही उपलब्ध असतात. त्यामुळे केजरीवाल यांनी ही सुविधा घेतल्यास ते सरकारी निवासस्थानात राहू शकतील.