वडिलांच्या हयातीत मुलाला वडिलोपार्जित मालमत्तेत हिस्सा मागता येतो का?

Rashmi Mane

मुलाला मालमत्तेत हिस्सा मिळतो का?

वडिलोपार्जित मालमत्तेवरून अनेक कुटुंबांमध्ये वाद होतात. मात्र, वडील जिवंत असतानाच मुलगा मालमत्तेत हिस्सा मागू शकतो का? कायदा काय सांगतो, जाणून घ्या.

Women Property Benefits,

वडिलोपार्जित मालमत्ता म्हणजे काय?

चार पिढ्यांपासून वारसाहक्काने चालत आलेली मालमत्ता म्हणजे वडिलोपार्जित मालमत्ता. हिंदू कायद्यानुसार अशा मालमत्तेत जन्मतःच हक्क मिळू शकतो.

Women Property Benefits,

मुलाला जन्मतःच अधिकार

वडिलोपार्जित मालमत्तेत मुलगा आणि मुलगी दोघांनाही जन्मापासून समान हक्क असतो. हा अधिकार वडिलांच्या मृत्यूनंतरच मिळतो, असे नाही.

Women Property Benefits,

वडील जिवंत असतानाही हिस्सा मागता येतो?

होय! पात्र वडिलोपार्जित मालमत्तेत मुलाला वडील जिवंत असतानाही कायदेशीर वाटणीची मागणी करता येते.

Women Property Benefits, | AI Image

मुलींनाही समान अधिकार

2005 च्या हिंदू वारसा कायद्यातील सुधारणेनुसार मुलींनाही मुलांप्रमाणेच वडिलोपार्जित मालमत्तेत समान हक्क मिळाला आहे.

स्वकष्टार्जित मालमत्तेचा नियम वेगळा

वडिलांनी स्वतःच्या कमाईतून खरेदी केलेल्या मालमत्तेवर मुलाला जन्मतःच हिस्सा मागण्याचा अधिकार नसतो.

न्यायालयात दाद मागता येते

वाटणीवरून वाद झाल्यास संबंधित व्यक्ती न्यायालयात विभाजनाचा दावा दाखल करू शकते. मात्र, मालमत्तेचे स्वरूप महत्त्वाचे ठरते.

कायदेशीर सल्ला घेणे महत्त्वाचे

प्रत्येक मालमत्तेचा इतिहास आणि कागदपत्रे वेगळी असतात. त्यामुळे हिस्सा मागण्यापूर्वी मालमत्तेची कायदेशीर स्थिती तपासून तज्ज्ञ वकिलांचा सल्ला घ्या.

Next : स्वतःचा व्यवसाय सुरू करायचाय? मग 'या' सरकारी योजनेतून बचत गटांना मिळतंय स्वस्त कर्ज!

येथे क्लिक करा