Rashmi Mane
स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न पाहताय? महिला बचत गटातील सदस्यांसाठी केंद्र सरकारची लखपती दीदी योजना फायदेशीर ठरू शकते. या योजनेतून महिलांना व्यवसायासाठी आर्थिक मदत मिळते.
महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे आणि त्यांचे उत्पन्न वाढवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
महिला स्वयं-सहायता बचत गटांमधील महिलांना विविध व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन आणि आर्थिक सहाय्य दिले जाते.
व्यवसायाच्या गरजेनुसार बचत गटांना बँकांमार्फत 1 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते.
बचत गटांना बँकांशी जोडून परवडणाऱ्या व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते. मात्र, कर्ज पूर्णपणे बिनव्याजी असेलच असे नाही.
शिवणकाम, दुग्धव्यवसाय, खाद्यपदार्थ निर्मिती, किराणा दुकान आणि हस्तकला असे व्यवसाय सुरू करता येतात.
व्यवसाय नियोजन, आर्थिक व्यवस्थापन आणि कौशल्य विकासासाठी महिलांना प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले जाते.
अधिक माहितीसाठी आपल्या गावातील बचत गटाच्या कार्यालयाशी किंवा उमेद अभियानाच्या स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधा. पात्रता आणि कर्जाच्या अटी तपासूनच अर्ज करा.