Vijaykumar Dudhale
भारतीय जनता पक्षाच्या माजी मंत्री, वरिष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांना लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर विधान परिषदेची उमेदवारी देऊन राजकीय पुनर्वसन केले आहे.
रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांना भाजपच्या कोट्यातून विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. यापूर्वीही भाजपने त्यांना विधान परिषदेवर घेऊन मंत्रिपदाची संधी दिली होती.
पिंपरी चिंचवडमधील देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय अमित गोरखे यांना निष्ठेचे फळ मिळाले असून त्यांना थेट आमदारकीची संधी मिळाली आहे.
माजी आमदार परिणय फुके यांना विधान परिषदेची उमेदवार देऊन विदर्भाला प्रतिनिधीत्व देण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आलेला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशासकीय कामकाज सांभाळणारे शिवाजीराव गर्जे यांना अजित पवार यांनी विधान परिषदेवर संधी देत वेगळा संदेश दिला आहे.
परभणी लोकसभा मतदारसंघासाठी इच्छूक असलेले राजेश विटेकर यांना थांबवून महादेव जानकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी त्यांना दिलेला शब्द विधान परिषदेवर संधी देत पूर्ण केला आहे.
भावना गवळी
लोकसभेची उमेदवारी कापण्यात आलेल्या वाशिमच्या भावना गवळी यांना विधान परिषदेवर संधी देत मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द पाळला.
कृपाल तुमाने यांचे तिकिट लोकसभा निवडणुकीत कापले होते. विधान परिषदेची उमेदवारी देऊन एकनाथ शिंदे यांनी त्यांचे राजकीय पुनर्वसन केले आहे.
पुण्यातील हडपसरचे माजी आमदार, भाजप युवा मोर्चाचे माजी प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊन पुन्हा राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणले आहे.