Lok Sabha Election 2024 : पाचव्या टप्प्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोकसभेचे उमेदवार

Vijaykumar Dudhale

भाजप

पाचव्या टप्प्यात भाजपचे उमेदवार सर्वाधिक गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. गंभीर गुन्हे असलेले 12, तर किरकोळ गुन्हे असलेले 19 उमेदवारांचा समावेश आहे.

BJP | Sarkarnama

काँग्रेस

गुन्हे दाखल असलेले 15 उमेदवार हे काँग्रेसच्या चिन्हावर लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसच्या सात उमेदवारांवर गंभीर, तर आठ उमेदवारांवर किरकोळ गुन्हे आहेत.

congress | Sarkarnama

बहुजन समाज पार्टी

बहुजन समाज पार्टीच्या 14 उमेदवार हे गुन्हेगारी पार्श्वभूमीच आहेत. त्यात सहा उमेदवार हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे असलेले आहेत, तर आठ उमेदवारांवर किरकोळ स्वरूपाचे गुन्हे आहेत.

BSP | Sarkarnama

समाजवादी पार्टी

समाजवादी पार्टीच्या नऊ उमेदवारांवर गुन्हे दाखल असून त्यातील चार उमेदवारांवर गंभीर स्वरूपाचे, तर पाच उमेदवारांवर किरकोळ स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

Samajwadi Party | Sarkarnama

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चार उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. त्यातील एकावर गंभीर स्वरूपाचा, तर तिघांवर किरकोळ स्वरूपाचे गुन्हे आहेत.

Shivsena UBT | Sarkarnama

तृणमूल काँग्रेस

तृणमूल काँग्रेसचे पाच उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून त्यातील दोघांवर गंभीर, तर तिघांवर किरकोळ स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे.

TMC | Sarkarnama

बीजेडी-राष्ट्रीय जनता दल

ओडिशामधील सत्ताधारी बीजेडी पक्षातील एका उमेदवार किरकोळ स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे. राष्ट्रीय जनता दलाच्याही दोन उमेदवारांवर गुन्हे दाखल असून त्यातील एकावर गंभीर, तर एकावर किरकोळ स्वरूपाच्या गुन्ह्याची नोंद आहे.

BJD | Sarkarnama

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पाच उमेदवारांवर गुन्हे दाखल असून त्यातील दोघांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. तिघांवर किरकोळ स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत

CPM | Sarkarnama

'मॉडेल' पेक्षा कमी नाही 'या' IAS अधिकारी, फोटो एकदा बघाच!

IAS Ananya Singh | Sarkarnama