Jagdish Patil
मनोरंजन विश्वात महत्वाचा मानला जाणारा कान्स चित्रपट महोत्सव यंदा 13 मे ते 24 मे या काळात आयोजित करण्यात आला होता.
78 व्या कान्स महोत्सवातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या उपस्थितीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
या महोत्सवाला हजेरी लावल्यानंतर तेथील काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
कान्स महोत्सवात अमृता फडणवीसांनी यांनी केलेला लूक चर्चेचा विषय ठरला होता.
यावेळी त्यांनी युनेस्को आणि बेटर वर्ल्ड संस्थेने आयोजित केलेल्या 'महिलांची समानता' या विषयावरील चर्चासत्रात देखील सहभाग घेतला.
यावेळी त्यांनी एक सामाजिक जबाबदारीही स्वीकारली असून आता त्या 'Ambassador for womens rights' म्हणून काम पाहणार आहेत.
याबद्दलची माहिती त्यांनी फोटो शेअर करताना लिहिलेल्या कॅप्शनमधून दिली.
ही जबाबदारी स्विकारल्यानंतर त्या जगभरातील महिलांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवणार आहेत.