Deepak Kulkarni
सियाचीन ग्लेशियरवरील ऑपरेशनल पोस्टवर तैनात होणारी पहिली महिला वैद्यकीय अधिकारी बनून कॅप्टन फातिमा वसीम यांनी इतिहास रचला आहे.
जगातील सर्वात उंच युद्धभूमी म्हणजे उत्तर भारतातील सियाचीन ग्लेशियर म्हणून ओळखले जाते.
फातिमा वसीम यांनी सियाचीन बॅटल स्कूलमध्ये प्रशिक्षण घेतले.
या प्रशिक्षणानंतर त्यांना जवळपास 15 हजार 200 फूट उंचीवर असलेल्या ऑपरेशनल पोस्टवर तैनात करण्यात आले आहे.
या ठिकाणी तैनात झाल्यानंतर भारतीय लष्कराने कॅप्टन फातिमा वसीम यांच्याविषयी कौतुकोद्गार काढले आहेत.
लष्कराने 15,000 फूट उंचीवरील फातिमा यांची पोस्टिंग त्यांची अदम्य भावना आणि उच्च प्रेरणा दर्शवत असल्याचे म्हटलं आहे.
भारतीय लष्कराच्या फायर अँड फ्युरी कॉर्प्स या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.
कॅप्टन फातिमा वसीमचे फोटो आणि व्हिडिओही प्रसिद्ध झाले आहेत.
तिथे आता देशाच्या मुलींनाही सियाचीनमध्ये तैनात केले जात आहे.
NEXT : महुआ आणि हेन्री : द अनटोल्ड स्टोरी