Rashmi Mane
जगातील सर्वात उंच युद्धभूमीवर तैनात होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी शिवा चौहान.
भारतीय सैन्यात महिलांचा सहभाग सध्या झपाट्याने वाढत आहे. याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे शिवा चौहान.
जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीनमध्ये सक्रियपणे तैनात असलेल्या शिवा पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत.
सियाचीन परिसरात महिला तैनात होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
शिवा चौहान यांचा जन्म 18 जुलै 1997 ला उदयपूर, राजस्थान येथे झाला.
उदयपूरच्या सेंट अँथनी सीनियर सेकेंडरी स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले आहे.
शिवा यांनी उदयपूरच्या 'एनजेआर' इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये पदवी पूर्ण केली.
सियाचीन बॅटल स्कूलमध्ये महिनाभर कठोर प्रशिक्षण घेतल्यानंतर शिवाला 15,600 फूट उंचीवर असलेल्या कुमार पोस्टवर तीन महिन्यांसाठी तैनात करण्यात आले आहे.