सरकारनामा ब्यूरो
बिहार मधील पुर्णिया या मतदारसंघाचे खासदार पप्पू यादव म्हणजेच राजेश रंजन हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात.
तसेच त्यांचा अजून एक चर्चेचा विषय ठरतोय तो म्हणजे त्यांचं कार आणि बाईक कलेक्शन...
पप्पू यादव यांच्याकडे लाखोकरोडो किमतीच्या महागड्या कार आहेत.
पप्पू यादव यांनी 2015 मॉडेलची हार्ले डेविडसन ही बाईक खरेदी केली आहे. ज्याची किंमत 5 लाख रुपये असून तिची चर्चा संपूर्ण बिहारभर आहे.
पप्पू आणि त्याची पत्नी रणजीत रंजन यांच्याकडेही हार्ले डेव्हिडसन ही बाईक आहे. एकदा रणजीत रंजन या बाईक घेऊन संसदेत आल्या होत्या.
पप्पू यादव यांचं बाईक आणि कार प्रेम वाखाळण्याजोगे आहे. अनेकदा पप्पू रॅलीदरम्यान मोठ्या एसयूव्ही कारमध्ये प्रवास करतांना दिसतात.
तसेच त्यांच्याकडे टोयोटाची इनोवा 2014 माॅडेलची कार आहे ज्याची किंमत 7.77 लाख रुपये इतकी आहे.