Jagdish Patil
अपमानाचा बदला लढून नव्हे, तर समोरच्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी बनून घेतला जातो याचं उत्तम उदाहरण म्हणजे उदय कृष्ण रेड्डींची सक्सेस स्टोरी.
माजी पोलिस कॉन्स्टेबल रेड्डी यांनी UPSC ची नागरी सेवा परीक्षा 2023 पास होऊ अपमानाचा बदला घेतला आहे.
2013 मध्ये मिळालेली पोलिस कॉन्स्टेबलची नोकरी त्यांनी 2018 मध्ये सोडली. कारण एका सर्कल इन्स्पेक्टरने सहकाऱ्यांसमोर त्यांचा अपमान केला होता.
राजीनाम्यानंतर त्यांनी UPSC वर आपलं लक्ष केंद्रित केलं आणि सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत 2023 मध्ये 780 वी रँक मिळवली.
सध्या ते भारतीय रेल्वेत (IRS) कार्यरत आहेत. त्यांचे IAS होण्याचे स्वप्न अद्याप अपूर्ण आहे. यासाठी ते अजून UPSC ची तयारी करताहेत.
याआधी दिलेल्या परीक्षेच्या निकालात चांगली पोस्ट मिळाली तर ते IRS अधिकारी पदाचा राजीनामा देणार आहेत.
चांगली पोस्ट मिळाली नाही तर ते UPSC चा अभ्यास चालू ठेवणार आहेत.