IPS Praveen Sood : कर्तव्यनिष्ठ आयपीएस अधिकारी ! CBI संचालक प्रवीण सूद...

Rashmi Mane

प्रवीण सूद

आयपीएस अधिकारी प्रवीण सूद यांचा सीबीआय संचालक पदापर्यंतचा प्रवास काही कमी प्रेरणादायी नाही. 1986 बॅचचे IPS अधिकारी प्रवीण सूद मूळचे हिमाचल प्रदेशचे आहेत.

IIT दिल्ली येथून शिक्षण

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT)-दिल्ली, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM)-बंगलोर आणि न्यूयॉर्कमधील सिरॅक्युज विद्यापीठातून त्यांनी शिक्षण घेतले आहे.

पहिली पोस्टिंग

IPS अधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग 1989 मध्ये म्हैसूर येथे झाली.

पोलिस अधीक्षक

1989 मध्ये म्हैसूरमध्ये सहाय्यक पोलिस अधीक्षक म्हणून त्यांची कारकीर्द सुरू झाली.

सीबीआय संचालक

प्रवीण सूद यांची 2023 मध्ये सीबीआय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

कर्नाटकचे डीजीपी

त्यापुर्वी ते कर्नाटकचे पोलिस महासंचालक (डीजीपी) म्हणून कार्यरत होते. आयपीएस अधिकाऱ्याने 2004-2007 पर्यंत म्हैसूर शहर पोलिस आयुक्त म्हणूनही काम केले. पाकिस्तानी वंशाच्या दहशतवाद्यांना अटक करण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

मॉरिशसमध्ये नियुक्ती

सूद यांनी 1999 पासून तीन वर्षे मॉरिशसमध्ये प्रतिनियुक्तीवरही काम केले आहे.

पुरस्कार

प्रवीण सूद यांना 1996 मध्ये उत्कृष्ट सेवेसाठी मुख्यमंत्री सुवर्ण पदक, 2002 मध्ये उत्कृष्ट सेवेसाठी पोलिस पदक आणि 2011 मध्ये विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक देण्यात आले.

Next : 'लोहपुरुषा'ला भारतरत्न... 

येथे क्लिक करा