CTET परीक्षेबाबत मोठी अपडेट; लवकर भरा अर्ज, अशी आहे प्रक्रिया...

Rajanand More

परीक्षा बंधनकारक

देशभरातील शाळांमध्ये शिक्षक पदावर नियुक्तीसाठी सीटीईटी किंवा राज्यस्तरावरील टीईटी परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक केले आहे. महाराष्ट्रातही हा नियम लागू आहे.

CTET | Sarkarnama

CTET

ही परीक्षा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून CBSE घेतली जाते. पुढील वर्षी ८ फेब्रुवारी रोजी ही परीक्षा होणार आहे. त्यासाठी अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे.

CTET | Sarkarnama

अर्ज भरा

परीक्षेचे अर्ज भरण्यास गुरूवारपासून (२७ नोव्हेंबर) सुरूवात झाली आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरून १८ डिसेंबरपर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरता येतील.

CTET | Sarkarnama

कशी असेल परीक्षा?

८ फेब्रुवारी रोजी होणारी परीक्षा दोन शिफ्टमध्ये असेल. पहिला पेपर इयत्ता पहिली ते पाचवी आणि दुसरा पेपर इयत्ता सहावी ते आठवीपर्यंतच्या शिक्षकांसाठी असेल.

CTET | Sarkarnama

निगेटिव्ह मार्किंग?

दोन्ही पेपरमध्ये प्रत्येकी १५० वस्तूनिष्ठ प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नाला एक गुण असेल. त्याचप्रमाणे निगेटिव्ह मार्किंग असणार नाही. उत्तर चुकले तरी मिळालेल्या गुणांवर परिणाम होणार नाही.

Teacher | Sarkarnama

असा भरा अर्ज

अर्ज ctet.nic.in या अधिकृत संकेतस्थळावरून भरता येईल. होमपेजवर Apply for CTET February 2026 या लिंकवर क्लिक करा.

Teacher | Sarkarnama

नोंदणी

नाव, मोबाईल, ई-मेल आयडी टाकून नवीन नोंदणी करा. नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड मेलवर किंवा मोबाईलवर एसएमएसने येईल.

Teacher | Sarkarnama

शुल्क

लॉगीन करून संपूर्ण माहिती आणि शुल्क भरल्यानंतर अर्ज भरणे पूर्ण होईल. खुला व ओबीसी प्रवर्गासाठी एका पेपरसाठी एक हजार तर दोन्ही पेपरसाठी १२०० रुपये शुल्क असले. एससी, एसटींसाठी हे शुल्क अनुक्रमे ५०० व ६०० रुपये. 

Teacher | Sarkarnama

NEXT : आयुष्मान भारत कार्डधारकांना आता 5 ऐवजी 10 लाखांचे आरोग्य कवच; योजनेचा फायदा घेण्यासाठी जाणून घ्या पात्रता

येथे क्लिक करा.