Celebrities in New Parliament : हेमा मालिनी ते कंगना... हे सेलिब्रिटी पोहचले संसदेत!

Rajanand More

हेमा मालिनी

उत्तर प्रदेशातील मथूरा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर सलग तिसऱ्यांदा विजयी. त्या श्रीकृष्णाचा भक्त असल्याने मथुरेत त्यांच्या प्रचंड लोकप्रियता आहे.

Hema Malini | Sarkarnama

शत्रुघ्न सिन्हा

पश्चिम बंगालमधील आसनसोल मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा लोकसभेत. 2022 मध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यापासून खासदार.

Shatrughan Sinha | Sarkarnama

कंगना रनौत

हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे मातब्बर उमेदवार विक्रमादित्य सिंह यांचा दारूण पराभव केला आहे. भाजपच्या खासदार म्हणून लोकसभेत प्रवेश.

Kangana Ranaut | Sarkarnama

रवी किशन

उत्तर प्रदेशातील गोरखपूर मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा भाजपकडून तिकीट. समाजवादी पक्षाच्या उमेदवाराचा दारूण पराभव.

Ravi Kishan | Sarkarnama

जून मॅलिआ

तृणमूल काँग्रेसच्या नेत्या असून मेदिनीपूर मतदारसंघातून विजयी. भाजपच्या अग्निमित्रा पॉल यांचा पराभव केला. 2021 पासून आमदार आहेत.

June Maliah | Sarkarnama

मनोज तिवारी

उत्तर पूर्ण दिल्ली मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर सलग तिसऱ्यांदा खासदार. काँग्रेसचे युवा नेते कन्हैया कुमार यांना पराभूत केले.

Manoj Tiwari | Sarkarnama

रचना बॅनर्जी

पश्चिम बंगालमधील हुगळी मतदारसंघात तृणमूल काँग्रेसच्या तिकीटावर पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात. भाजप उमेदवाराचा पराभव करत विजय मिळवला.

Rachana Banerjee | Sarkarnama

सुरेश गोपी

केरळातील भाजपचे एकमेव खासदार. त्रिसूर मतदारसंघातून विजयी. पहिल्यांदाच भाजपला खाते उघडता आले.

Suresh Gopi | Sarkarnama

NEXT : सर्वात कमी वयात खासदार, कोण आहे शांभवी चौधरी?