Rashmi Mane
भारतात होणाऱ्या पुढील जनगणनेबाबत सरकारने मोठी घोषणा केली आहे. 2026-27 मध्ये होणार पहिली डिजिटल जनगणना, नागरिक स्वतः भरू शकणार माहिती!
कोविडमुळे मागे पडलेली जनगणना आता लवकरच पूर्ण होणार आहे. यातच ही देशातील पहिली डिजिटल जनगणना असेल, ज्यामध्ये सामान्य लोक स्वतःची माहिती ऑनलाइन नोंदवू शकतील.
यासाठी सरकार एक विशेष वेब पोर्टल सुरू करणार आहे. याशिवाय जनगणनेचे काम मोबाईल अॅपद्वारेही पूर्ण केले जाईल.
भारतात आतापर्यंत सरकारी कर्मचारी जनगणनेसाठी घरोघरी जाऊन कागदावर माहिती गोळा करायचे. पण आता याची गरज नाही. डिजिटल यंत्रणेचा वापर होणार.
आता ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल करणार आहे. पहिल्यांदाच, मोबाईल अॅप आणि ऑनलाइन पोर्टलद्वारे लोकांची माहिती गोळा केली जाईल. या प्रक्रियेमुळे कामाला गती तर मिळेलच पण डेटा थेट सरकारच्या केंद्रीय सर्व्हरपर्यंत सुरक्षित पद्धतीने पोहोचेल.
2026 आणि 2027 मध्ये दोन टप्प्यात जनगणना केली जाईल. पहिला टप्पा 1 एप्रिल 2026 पासून सुरू होईल, ज्यामध्ये घरांची मोजणी केली जाईल.
तर दुसऱ्या टप्पात 1 फेब्रुवारी 2027 पासून सुरू होईल, ज्यामध्ये लोकांची लोकसंख्या, जात आणि इतर आवश्यक माहिती गोळा केली जाईल.
स्वातंत्र्योत्तर भारतातील ही 16वी आणि डिजिटल पद्धतीने होणारी पहिली जनगणना
देशाच्या भविष्यासाठी हा मोठा टप्पा असेल.