Mangesh Mahale
आकस्मिक आर्थिक गरज भागवण्यासाठी लोक क्रेडिट कार्डवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतात.
भारतात पहिले क्रेडिट कार्ड 44 वर्षांपूर्वी, 1980 मध्ये देण्यात आले होते.
सेंट्रल बँक ऑफ इंडियाने ‘सेंट्रल कार्ड’ नावाचे पहिले क्रेडिट कार्ड बाजारात आणले.
हे कार्ड व्हिसा (VISA) नेटवर्कच्या माध्यमातून कार्यरत होते, त्यावेळी क्रेडिट कार्ड ही एक नवीन सुविधा होती.
2000 ते 2010 या दशकात इंटरनेटच्या वाढीमुळे ऑनलाइन खरेदीचे प्रमाण झपाट्याने वाढले.
IRCTC, Flipkart, MakeMyTrip सारख्या कंपन्यांनी ऑनलाइन पेमेंट सिस्टीम लोकप्रिय केली.
2010 नंतर, NPCI ने RuPay कार्ड्स बाजारात आणले.
भारतात सुमारे 11 कोटींहून अधिक सक्रिय क्रेडिट कार्ड्स आहेत.