Mangesh Mahale
संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत (UNGA) सहभागी होण्यासाठी राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी या नुकत्याच न्यूयॉर्कला रवाना झाल्या.
जागतिक मंचावर देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे, असे कुलकर्णी म्हणाल्या.
जागतिक शांतता, सहकार्य आणि विकासावर होणाऱ्या चर्चांमध्ये भारताची सार्थक भूमिका आणखी बळकट करण्याच्या दृष्टीने ही एक सुवर्णसंधी आहे.
यापूर्वी केंद्र सरकारच्या विविध समित्यांवर राज्यसभा खासदार या नात्याने मेधा कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
वक्फ कायदा दुरुस्ती विधेयक २०२५ संदर्भात नियुक्त करण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीमध्ये त्यांचा समावेश होता.
या समितीमधील चर्चेदरम्यान अत्यंत प्रभावीपणे बाजू मांडल्याबद्दल मेधा कुलकर्णी यांचा विशेष उल्लेख करण्यात आला होता.
पुण्यातील कोथरुड परिसरातून त्या नगरसेविका ते आमदार म्हणून निवडणूक आल्या होत्या.
नगरसेविका ते राज्यसभा खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास आहे.