Ganesh Sonawane
केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेत देशभरातील तब्बल 334 राजकीय पक्षांची मान्यता रद्द केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील 9 पक्षांचा समावेश आहे.
सलग सहा वर्षे कोणत्याही निवडणूक प्रक्रियेत सहभागी न झालेल्या आणि नोंदणीकृत पत्ता अस्तित्वात नसलेल्या महाराष्ट्रातील 9 पक्षांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाने काही महिन्यांपूर्वी पक्षांची चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. त्यामध्ये हे पक्ष निवडणूक आयोगाच्या नियमांचे पालन करत नसल्याचे समोर आले होते.
या ९ पक्षांना डिलीस्टेड म्हणजेच यादीतून वगळलेले पक्ष म्हणून चिन्हांकित करण्यात आले आहे.
अवामी विकास पार्टी, बहुजन रयत पार्टी, भारतीय संग्राम परिषद, इंडियन मिलन पार्टी ऑफ इंडिया, नवभारत डेमोक्रॅटिक पार्टी, नवबहुजन समाजपरिवर्तन पार्टी, पीपल्स गार्डियन, द लोक पार्टी ऑफ इंडिया आणि युवा शक्ती संघटना या राजकीय पक्षांची मान्यता रद्द झाली आहे.
आयोगाने स्पष्ट केले आहे की, या निर्णयाने प्रभावित कोणताही पक्ष 30 दिवसांच्या आत या निर्णयाविरोधात अपील करू शकतो.
या ९ पक्षांना आता कोणतेही निवडणूक लाभ मिळणार नाहीत. यात निवडणूक चिन्हांचा वापर, आयकर सवलत, प्रचारासाठी मिळणाऱ्या विशेष सुविधा यांचा समावेश आहे.
निवडणूक आयोगाच्या या कारवाईनंतर देशभरात केवळ सहा राष्ट्रीय तर 67 प्रादेशिक पक्ष राहिलेले आहेत