Vijaykumar Dudhale
केंद्र सरकारने डिजिटल ॲग्रिकल्चर मिशनसाठी 2817 कोटी रुपयांचा निधी दिला आहे.
अन्न आणि पोषण घटक सुरक्षा योजनेसाठी 3979 कोटी रुपये केंद्र सरकारने मंजूर केले आहेत.
देशभरातील कृषी विज्ञान केंद्रे बळकट करण्यासाठी 1202 कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य केंद्राकडून देण्यात येणार आहे.
कृषी शिक्षण, व्यवस्थापन, सामाजिक विज्ञान या योजनेसाठी 2291 कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारकडून मिळणार आहे.
नैसर्गिक साधन संपत्तीचं व्यवस्थापन करण्याच्या योजनेसाठी 1115 कोटी रुपये खर्चाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.
शाश्वत पशुधन आरोग्य आणि उत्पादनासाठी 1702 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
फळशेतीचा शाश्वत विकास साधण्यासाठी 860 कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारकडून मंजूर करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी कृषी क्षेत्रासाठी एकूण 13 हजार 960 कोटी रुपयांच्या योजनांना मंजुरी देण्यात आली आहे.