Modi Government Scheme: केंद्र सरकार लवकरच मोठा निर्णय घेणार; लोकप्रिय योजनेत मिळणारा परतावा एकदम डबल होणार

Deepak Kulkarni

मोठी अपडेट

मोदी सरकारच्या एक सर्वोत्तम व लोकप्रिय योजना असलेल्या अटल पेन्शन योजनेबाबत सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे.

Atal Pension Yojana New Update | Sarkarnama

मासिक पेन्शन वाढणार

केंद्र सरकारकडून अटल पेन्शन योजना धारकांना कमाल मासिक पेन्शन ₹5000 वरून ₹10,000 पर्यंत वाढवण्याचा विचार सुरू असल्याची माहिती आहे.

Atal Pension Yojana New Update | Sarkarnama

योजनेच्या कालावधीत वाढ

महत्त्वाची बाब म्हणजे सरकारने ही योजनेचा कालावधी 2030-31 पर्यंत वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

Atal Pension Yojana New Update | Sarkarnama

90 लाखांहून अधिक नोंदणी

मोदी सरकारच्या या लोकप्रिय योजनेसाठी 21 एप्रिल 2026 पर्यंत 90 लाखांहून अधिक लोकांनी नोंदणी केली आहे.

Atal Pension Yojana New Update | Sarkarnama

मोठी वाढ

आश्चर्यकारक म्हणजे अटल पेन्शन योजनेत 2025-26 या एकाच आर्थिक वर्षात 13.5 लाखांहून अधिक नवीन सदस्य सहभागी झाले आहेत.

Atal Pension Yojana New Update | Sarkarnama

योजनेवर काम सुरू

भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाकडून वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर वयाच्या 60 वर्षांनंतर मिळणारी हमी पेन्शन ₹5000 वरून ₹10000 पर्यंत वाढवण्यासाठी योजनेवर काम करत आहे.

Atal Pension Yojana New Update | Sarkarnama

पात्रता..

या योजनेसाठी 18 ते 40 वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक जो आयकर भरत नाही, तो अर्ज करू शकतो.

Atal Pension Yojana New Update | Sarkarnama

फायदा...

सध्याच्या योजनेनुसार वयाच्या 60 वर्षांनंतर ₹1000 ते ₹5000 ची हमी असलेली मासिक पेन्शन मिळते.

Atal Pension Yojana New Update | Sarkarnama

...म्हणून योजनेला पसंती

लाभार्थी सदस्याच्या मृत्यूनंतर, जोडीदाराला समान पेन्शन मिळते आणि दोघांच्या मृत्यूनंतर, नॉमिनीला संपूर्ण निधी मिळतो.म्हणून योजनेला मोठी पसंती मिळत आहे.

Atal Pension Yojana New Update | Sarkarnama

NEXT: डिजिटल जनगणना महाराष्ट्रात 1 मे पासून सुरु: नागरिकांनाही करता येणार स्व-गणना

येथे क्लिक करा...