8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांनो लक्ष द्या! 8व्या वेतन आयोगाबाबत आली मोठी अपडेट!

Rashmi Mane

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट!

8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची हालचाल सुरू झाली आहे. आयोगाने पुन्हा बैठकींचे नियोजन सुरू केले असून विविध राज्यांतील कर्मचारी संघटना, निवृत्तीवेतनधारक आणि संबंधित प्रतिनिधींशी चर्चा होणार आहे.

8th Pay Commission Update

कधी मिळणार शिफारसी?

सर्व प्रक्रिया नियोजनानुसार पार पडल्यास 8वा वेतन आयोग आपल्या शिफारसी 2027 च्या पहिल्या सहामाहीत केंद्र सरकारकडे सादर करू शकतो. त्यानंतर सरकार निर्णय घेऊन नवीन वेतन संरचनेची अंमलबजावणी करण्याचा मार्ग मोकळा होईल.

8th Pay Commission Update

बैठकांचे आयोजन

आयोगाने सप्टेंबर 2026 मध्ये विविध ठिकाणी बैठका आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकींमध्ये कर्मचारी संघटना, विविध संस्था आणि इतर संबंधित घटकांकडून सूचना व मागण्या जाणून घेतल्या जाणार आहेत.

8th Pay Commission Update

चंदीगड दौरा ठरला

8वा वेतन आयोग 16 ते 18 सप्टेंबर 2026 दरम्यान चंदीगड येथे तीन दिवस राहणार आहे. पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगडमधील संबंधित प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा होणार आहे.

8th Pay Commission Update

कोण करू शकतात अर्ज?

केंद्र सरकारच्या संस्था, कर्मचारी संघटना, फेडरेशन, युनियन, निवृत्तीवेतनधारक आणि इतर संबंधित पक्ष आयोगासोबत चर्चेसाठी अर्ज करू शकतात. चंदीगड बैठकीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 ऑगस्ट 2026 आहे.

8th Pay Commission Salary | Sarkarnama

बैठका

7 ते 10 ऑगस्ट 2026 रोजी दिल्ली, 7 ते 8 सप्टेंबर रोजी चेन्नई आणि 9 सप्टेंबर रोजी पुडुचेरी येथे बैठका होणार आहेत. संबंधित संघटनांना निश्चित मुदतीपूर्वी भेटीसाठी विनंती सादर करावी लागणार आहे.

8th Pay Commission Update: | Sarkarnama

बैठकींचा उद्देश काय?

या बैठकींमध्ये वेतन, भत्ते, सेवा अटी आणि निवृत्तीवेतनाशी संबंधित मागण्यांवर चर्चा केली जाणार आहे. आयोग सर्व संबंधितांचे मत जाणून घेतल्यानंतर अंतिम शिफारसी तयार करणार आहे.

8th Pay Commission | Sarkarnama

कर्मचाऱ्यांसाठी काय महत्त्वाचे?

8व्या वेतन आयोगाच्या बैठका वेतनवाढीच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा मानल्या जात आहेत. आता सर्वांचे लक्ष आयोगाच्या अंतिम शिफारसी आणि त्यानंतर केंद्र सरकारच्या निर्णयाकडे लागले आहे.

Pay Commission | Sarkarnama

Next : काँग्रेसमधून राजकीय इनिंग, भाजपमध्ये महत्त्वाची जबाबदारी अन् आता राजीनामा! कोण आहेत शेहझाद पूनावाला?

येथे क्लिक करा