सरकारनामा ब्यूरो
पंतप्रधान ज्योति विमा योजना ही एक सरकारी योजना असून यामध्ये 18 ते 58 वयापर्यंतच्या लोकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
पंतप्रधान ज्योति विमा योजना योजनेचा हप्ता फक्त 436 रुपये इतका असणार असून यातून लाभधारकाला 2 लाख रुपयांचा विमा कव्हर मिळणार आहे.
कसा कराल अर्ज- योजनेचा फाॅर्म ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीना भरता येणार असून या बॅक खात्याच्या माध्यामातून लाभधारक ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्जासाठी मागणी करू शकणार आहे.
योजनेअंतर्गत एका वर्षासाठी असून यातून 2 लाख रुपयांचा विमा कव्हर दिला जाणार आहे. या योजनेचा अर्ज केल्यावर एकाच हप्त्यात 436 रुपये अकाउंटमधून आपोआप कट होतील.
योजनेचे नुतनीकरण वर्षानुवर्षा करता येणार आहे.जर लाभधारकांचा अचानक मुत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला 2 लाख रुपये मिळणार आहेत.
जर एखाद्या व्यक्तीने अनेक बँकेत एकाच नावाने अंकाउट उघडले असेल तरही तो कोणत्यातरी एका अकांउटच्या माध्यमातून या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे.
पीएमजेजेबीवाय योजनेसाठी आधार कार्ड आणि बँक खात्याचा तपशील हे महत्वाचे कागदपत्रं असणार आहेत.
भारतीय बँकेच्या शाखेत लाभधारकाचे बँक खाते असलेला कोणताही एनआरआय योजनेशी संबंधित अटी आणि शर्ती पूर्ण करण्याच्या अधीन राहून तो पीएमजेजेबीवाय कव्हर योजनेस पात्र ठरणार आहे.
योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2025 असणार आहे.