Aadhar Card: केंद्र सरकारचा आधार कार्डबाबत मोठा निर्णय; सर्वसामान्य कोट्यवधी लोकांना होणार फायदा

Deepak Kulkarni

महत्त्वपूर्ण निर्णय

केंद्र सरकारच्या 'युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया' (UIDAI) नं आता सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारा एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे.

Aadhar Card New Update | Sarkarnama

पैसे मोजण्याची आवश्यकता नाही...

नागरिकांनो, जर तुम्हांला तुमच्या आधार कार्डमध्ये ईमेल आयडी लिंक किंवा इतर बदल करायचे असतील,तर त्यासाठी पैसे मोजण्याची आवश्यकता भासणार नाही.

Aadhar Card New Update | Sarkarnama

मोफत संधी

सरकारच्या 'यूआयडीएआय'नं 1 जुलै 2026 पासून 31 डिसेंबर 2026 या कालावधीत देशातील सर्व नागरिकांसाठी त्यांच्या आधार कार्डवरील ई-मेल आयडी किंवा त्यात काही दुरुस्ती करायची असेल तर एक मोफत संधी उपलब्ध करुन दिली आहे.

Aadhar Card New Update | Sarkarnama

75 रुपये शुल्क

यापूर्वी आधार कार्डमधील ई-मेल आयडीत काही अपडेट करायची असेल किंवा इतर दुरुस्तीसाठी 75 रुपये शुल्क आणि जीएसटी आकारले जात होते.

Aadhar Card New Update | Sarkarnama

घरबसल्या लाभ...

नागरिकांनी घरबसल्या मोबाईल ॲपव्दारे यूआयडीएआयच्या या नवीन डिजिटल सुविधेचा घेता येणार आहे.

Aadhar Card New Update | Sarkarnama

हे घेऊ शकतात फायदा...

आत्तापर्यंत ज्या नागरिकांनी आधार कार्डशी ईमेल आयडी लिंक केला नाही किंवा बदललेला ईमेल, पत्ता आधारवर अपडेट केला नसेल त्यांना या नव्या सरकारच्या निर्णयाचा निश्चितच फायदा होणार आहे.

Aadhar Card New Update | Sarkarnama

आर्थिक आणि वेळेची बचत

केंद्र सरकारच्या या एका मोठ्या निर्णयामुळे कोट्यवधी नागरिकांची आर्थिक व वेळेची बचत होणार आहे.

Aadhar Card New Update | Sarkarnama

तर किरकोळ शुल्क

महत्त्वाची बाब म्हणजे या सुविधेचा लाभ केवळ आधार ॲपद्वारे ईमेल अपडेट केला तरच मिळणार आहे. आधार वेबसाइट किंवा आधार केंद्रावर जाऊन हेच काम केले तर तुम्हाला किरकोळ शुल्क भरावे लागण्याची शक्यता आहे.

Aadhar Card New Update | Sarkarnama

अनेक सेवांचा सहज लाभ

सरकारचं UIDAI चे आधार ॲप अत्यंत महत्त्वाचे आहे. या ॲपद्वारे तुम्ही आधारशी संबंधित अनेक सेवांचा सहज लाभ घेऊ शकणार आहे.

Aadhar Card New Update | Sarkarnama

NEXT: EPFO चा आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय! PF चे पैसे 3 दिवसांत खात्यात जमा होणार; ऑटो सेटलमेंट फ्रेमवर्क नेमकं काय आहे?

EPFO PF Claim | Sarkarnama
येथे क्लिक करा...