FasTag New Rule : लाखो वाहनचालकांसाठी खुशखबर! FasTag बाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Rashmi Mane

वाहनधारकांसाठी मोठी घोषणा!

नितीन गडकरींनी केलेली मोठी घोषणा आता वाहनधारकांना मिळणार Fastag चा वार्षिक पास, 15 ऑगस्ट 2025 पासून लागू.

FasTag Pass | Sarkarnama

टोल रांगांना रामराम!

Fastag वार्षिक पासमुळे टोल नाक्यांवरील लांबच लांब रांगांपासून सुटका, जलद आणि सुरळीत प्रवास!

FasTag Pass | Sarkarnama

200 ट्रिप्स की एक वर्ष जे आधी संपेल!

हा पास एकदा घेतल्यानंतर एक वर्ष किंवा 200 ट्रिप्ससाठी वैध असेल – जे आधी पूर्ण होईल तिथे पास संपेल.

FasTag Pass | Sarkarnama

फक्त खासगी वाहनांसाठीच!

हा पास फक्त कार, जीप आणि व्हॅनसारख्या गैरव्यावसायिक खासगी वाहनांसाठी असणार आहे.

FasTag Pass | Sarkarnama

देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर लागू

हा पास संपूर्ण भारतातील राष्ट्रीय महामार्गांवर लागू असेल. प्रवास आता आणखी सोपा आणि वेगवान होणार आहे.

FasTag Pass | Sarkarnama

Fastag Annual Pass ची किंमत किती?

पासची किंमत फक्त 3000 रुपये! एकदा अ‍ॅक्टिव्ह झाला की वर्षभर तोच Fastag वापरा, कुठेही प्रवास करा.

FasTag Pass | Sarkarnama

कोठे मिळेल पास?

हा पास NHAI (National Highways Authority of India), MoRTH (Ministry of Road Transport and Highways of India) च्या अधिकृत वेबसाइटवर व ‘राजमार्ग यात्रा’ अ‍ॅपवर लवकरच उपलब्ध होणार आहे.

FasTag Pass | Sarkarnama

कोणत्या टोल नाक्यांवर वापरता येईल?

हा पास 60 किमीच्या अंतरात असलेल्या टोल प्लाझांवर लागू असेल – वारंवार प्रवास करणाऱ्यांसाठी फायदेशीर!

FasTag Pass | sarkarnama

Next : रेशनकार्डधारकांसाठी अल्टिमेटम, हे काम करा अन्यथा रेशन कार्ड होईल बंद 

येथे क्लिक करा