Deepak Kulkarni
केंद्र आणि राज्य सरकारकडून आता सर्वसामान्य कुटुंबासाठी मोठा आधार असलेल्या रेशन कार्डच्या नियमांत महत्वपूर्ण बदल केले आहेत.
महाराष्ट्रात येत्या 15 ऑगस्टपासून क्यूआर कोड आधारित नवीन स्मार्ट रेशन कार्ड देण्याची मोहीम सुरू होणार आहे.
आता सरकारकडून ई-केवायसी (e-KYC) अनिवार्य करणे, उत्पन्न मर्यादा आणि मालमत्तेचे कठोर निकष लागू करणे हे त्याचे प्रमुख बदल आहेत.
ई-केवायसी..
सरकारकडून करण्यात आलेल्या नव्या बदलांमध्ये रेशन दुकानात जाऊन आधार कार्डद्वारे ई-केवायसी करणे रेशन कार्डधारक कुटुंबासाठी बंधनकारक असणार आहे.
उत्पन्न मर्यादा निश्चित
सरकारकडून रेश कार्ड अंतर्गत सुविधांचा लाभ घेण्यासाठी शहरी भागात वार्षिक उत्पन्न 3 लाख व ग्रामीण भागात 2 लाखांपेक्षा जास्त असल्यास कुटुंब अपात्र ठरणार आहे.
ज्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन यात कार, ट्रॅक्टर किंवा 100 चौरस मीटरपेक्षा मोठा फ्लॅट/प्लॅट असेल त्यांना रेशन कार्डचा लाभ घेता येणार आहे.
आयकर भरत असलेल्या कुटुंबाला यापुढे रेशन कार्डचा लाभ घेता येणार नाहीये.
जर एखाद्या व्यक्तीनं चुकीची माहिती देऊन रेशन कार्डचा गैरफायदा घेतला तर त्याच्याकडून बाजारभावाप्रमाणे वसुली व कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.