Ganesh Sonawane
जळगावच्या बसस्टँडवर उतरून डोक्यावर सामानाचं ओझं घेऊन चाललेला हा माणूस साधा नाही. नवनिर्मितीचे हात आणि कामाची प्रचंड चिकाटी लाभलेला हा सर्जक आहे.
हे आहेत धुळे जिल्ह्यातील बारीपाडा गावचे चैत्राम पवार. या माणसाने बारीपाड्याच्या ओसाड माळरानाला हिरवं चैतन्य दिलं. स्वतःच्या प्रयत्नांनी त्यांनी जवळपास 5,000 हून अधिक झाडे लावली.
जैवविविधतेचे संवर्धनाच्या माध्यमातून 8 दुर्मीळ प्राणीप्रजाती, 48 पक्षीप्रजाती, व 435 झाडे, वेली, व झुडुपांच्या प्रजातींना आश्रय दिला. मृदा व जलसंधारणातही त्यांनी काम केलं. समाजाच्या सहकार्यातून 485 लहान बंधारे, 40 मोठे बंधारे बांधले त्यांनी बांधले.
अलिकडेच त्यांना राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते धुळे जिल्ह्यात जलसंधारण, वणीकरण, वन्यजीव क्षेत्रात केलेल्या उल्लखनीय कामनिमित्त पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे.
राष्ट्रपती भवनात झालेल्या या शानदार सोहळ्यात उपराष्ट्रपती जगदीप धनकड, पीएम मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा सन्मान करण्यात आला.
इतकेच नव्हे तर चैत्राम पवार यांना याधीही महाराष्ट्राचा पहिला वनभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आहे.
असे असनाही पाय जमिनीवर असणे म्हणजे काय असते, याची प्रचिती जळगावकरांना नुकतीच आली. जळगावकरांनी पवार यांच्या रुपाने खरा हिरो पाहिला.
प्रतिष्ठेचा पद्मश्री पुरस्कार मिळालेला हा माणूस रस्त्यावरून चक्क डोक्यावर सामानाचे गाठोडे घेऊन जाताना पाहुन जळगावकरांना आश्चर्याचा धक्का बसला.
त्यांच्या या साधेपणाची सगळीकडे चर्चा होत आहे. त्यांचा हा फोटो अवघ्या महाराष्ट्रात सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.