'गडकरी ते रोडकरी'; RSS स्वयंसेवक ते कार्यक्षम केंद्रीय मंत्री
Mangesh Mahale
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक ते सर्वाधिक लोकप्रिय आणि कार्यक्षम मंत्री म्हणून ओळख.
Nitin Gadkaris Today 68th Birthday | Sarkarnama
कार्यशैली, विकासात्मक दृष्टिकोन नेतृत्वामुळे सत्ताधाऱ्यांकडूनच नव्हे तर विरोधकांकडूनही सतत प्रशंसेस पात्र ठरले आहेत.
Nitin Gadkaris Today 68th Birthday | Sarkarnama
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज ६८ वा वाढदिवस साजरा करत आहेत.
Nitin Gadkaris Today 68th Birthday | Sarkarnama
त्यांनी उभारल्या गेलेल्या महामार्गांची चर्चा आंतरराष्ट्रीय पातळीवरही होत असते. लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी नाते जोडले आणि समाजकार्यात सहभाग घेतला.
Nitin Gadkaris Today 68th Birthday | Sarkarnama
वाणिज्य पदव्युत्तर शिक्षण, कायद्याची पदवी आणि बिझनेस मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा प्राप्त केला. त्यांच्या नेतृत्वकौशल्याचे प्रारंभिक दर्शन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकाळात घडले.
Nitin Gadkaris Today 68th Birthday | Sarkarnama
१९८० च्या दशकात त्यांनी भाजपमधून राजकीय प्रवास सुरू केला. १९८९ मध्ये ते प्रथमच महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य झाले. युती सत्तेत आल्यानंतर त्यांना सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद मिळाले.
Nitin Gadkaris Today 68th Birthday | Sarkarnama
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाची निर्मिती करून देशाला पहिले सहापदरी एक्सप्रेसवे दिले. मुंबईतील ५० हून अधिक उड्डाणपूल उभारल्यामुळे त्यांना “फ्लायओव्हर मॅन” अशी उपाधी लाभली.
Nitin Gadkaris Today 68th Birthday | Sarkarnama
२००९ मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारले. मोदी सरकार स्थापन झाल्यानंतर गडकरींना रस्ते परिवहन, महामार्ग मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली. आता ही जबाबदारी गडकरी यांच्याकडेच आहे.
Nitin Gadkaris Today 68th Birthday
त्यांच्या नेतृत्वात भारतात रस्ते बांधणीचा वेग १२ कि.मी./दिवसावरून ३० कि.मी./दिवसापर्यंत वाढला. राष्ट्रीय महामार्गांची लांबी ९१,००० कि.मी. वरून १,४६,००० कि.मी. झाली.
Nitin Gadkaris Today 68th Birthday | Sarkarnama
NEXT : केवळ 5 तास झोप अन् सतत काम..., देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंचा दिनक्रम नेमका कसा