Amol Sutar
अयोध्येतील श्रीराम मंदिराचा ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठापना सोहळा 22 जानेवारी रोजी पार पडणार आहे.
केंद्र सरकारच्यावतीने सर्वच शासकीय कार्यलायांना अर्धा दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
महाराष्ट्रानेही राज्यात 22 जानेवारीला सुट्टीच जाहीर केली आहे. सरकारने याबाबतचा अध्यादेश जाहीर केला आहे.
देशभरातील आठ राज्यांनी सुटी जाहीर केली असून इतर राज्यांत सुटी जाहीर करण्याची मागणी होत आहे.
या सुट्टीला आक्षेप घेत विधी विभागाच्या शिवांगी अग्रवाल, सत्यजीत साळवे, वेदांत अग्रवाल, खुशी बांगिया चार विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
या दिवशी सुट्टी जाहीर केल्याने शैक्षणिक संस्था बंद राहणार असल्याने, विद्यार्थ्यांचे तसेच बँका, शासकीय कार्यालयांसह अन्य कार्यालयं बंद राहिल्यास प्रशासकीय कामांचे नुकसान होईल.
देशातील महाराष्ट्रासह इतर सात राज्यांनी सुटी जाहीर केलेली आहे. छत्तीसगड, गोवा, ओडिशा, राजस्थान, आसाम, मध्य प्रदेश, हरियाणा या राज्यांत सार्वजनिक सुट्टी असणार आहे.
समाजातील विशिष्ट वर्गास किंवा धार्मिक समुदायास खूश करण्यासाठी सुट्टी जाहीर करणे चुकीचे असल्याचेही याचिकेत म्हटले आहे.