Roshan More
देशातील 30 मुख्यमंत्र्यांच्या निवडणुकीतील प्रतिक्षापत्राच्या आधारे स्वयंसेवी संस्था असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) आणि नॅशनल इलेक्शन वॉच (न्यू) यांची श्रीमंत आणि गरबी मुख्यमंत्र्यांची यादी तयार केली आहे.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू हे सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे एकुण 931 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
श्रीमंत मुख्यमंत्र्यांच्या यादीत अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांची संपत्ती 332 कोटी आहे. विशेष म्हणजे त्यांच्यावर 180 कोटींचे कर्ज देखील आहे.
श्रीमंत मुख्यमंत्र्यांच्या यादीत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या तिसऱ्या स्थानावर आहेत. त्यांच्याकडे 51 कोटी रुपयांची संपत्तीआहे.
साधी जीवनशैली असलेल्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे 1.54 कोटीची संपत्ती आहे.
केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांची एकूण संपत्ती 1.18 कोटी रुपये आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे मुख्यमंत्र्यांच्या यादीत सर्वात कमी संपत्ती आहे. त्यांची एकुण मालमत्ता 15.38 लाख रुपये आहे.
सर्वात कमी मालमत्ता असलेल्या मुख्यमंत्र्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आहेत. त्यांच्याकडे 55.24 लाख रुपयांची संपत्ती आहे.