Rashmi Mane
सावित्री जिंदल या ओ.पी. जिंदल ग्रुपच्या चेयरपर्सन एमेरिटस असून सध्या भारतातील सर्वात श्रीमंत महिला म्हणून ओळखल्या जातात.
Forbes 2025 च्या यादीनुसार त्यांची एकूण संपत्ती तब्बल 35.5 अब्ज डॉलर्स इतकी असून त्या देशातील टॉप-10 अब्जाधीशांमध्ये समाविष्ट होणाऱ्या एकमेव महिला आहेत.
ओ.पी. जिंदल ग्रुप हा भारतातील आघाडीचा तंत्रज्ञान समूह असून त्याचा विस्तार स्टील, ऊर्जा, इन्फ्रास्ट्रक्चर, सिमेंट आणि खनन क्षेत्रात आहे.
JSW Steel (सज्जन जिंदल), Jindal Steel & Power Ltd. (JSPL) (नवीन जिंदल), Jindal Stainless (रतन जिंदल) आणि Jindal Saw यांचा समावेश होतो. या सर्व कंपन्यांनी जागतिक स्तरावर भारतीय उद्योगजगताची प्रतिष्ठा उंचावली आहे.
सावित्री जिंदल यांचा प्रवास केवळ उद्योगजगतापुरता मर्यादित नाही. २००५ मध्ये पती ओ.पी. जिंदल यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाल्यानंतर त्यांनी राजकारणात पाऊल टाकले. हरियाणामधील काँग्रेसच्या नेत्या म्हणून त्यांनी कार्य केले आहे.
सावित्री जिंदल या सामाजिक कार्यातही सक्रिय आहेत. शिक्षण, आरोग्य आणि महिला सशक्तीकरणासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत.
आजच्या घडीला सावित्री जिंदल या केवळ भारतातील सर्वात श्रीमंत महिला नाहीत, तर उद्योग, समाजसेवा आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रांत सक्रिय सहभागातून त्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे.