Chandrakant Handore Congress Leader: 'काँग्रेस'कडून राज्यसभेचं तिकीट मिळालेले चंद्रकांत हंडोरे?

Rashmi Mane

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना राज्यसभेची उमेदवारी जाहिर झाली आहे.

माजी आमदार

चंद्रकांत हंडोरे हे मुंबईतील चेंबुर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार आहेत.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष

5 फेब्रुवारी 2021 रोजी हंडोरे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.

कॅबिनेट मंत्री

ते महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाचे माजी कॅबिनेट मंत्री आहेत.

लढवय्या आंबेडकरी कार्यकर्ता

चंद्रकांत हंडोरे यांचे नेतृत्त्व मुंबईतील आंबेडकरी चळवळीतून उदयाला आलं. लढवय्या आंबेडकरी कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे.

मुंबईचे महापौर

1992 ते 1993 या कालावधीत त्यांची मुंबईच्या महापौरपदी निवड झाली. हंडोरे हे 2014 ते 2021 या कालावधीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष होते.

"भीम शक्ती"

2020 पासून ते मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रभारीही आहेत. हंडोरे हे "भीम शक्ती" या आंबेडकरवादी आणि सामाजिक-राजकीय संघटनेचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत.

Next : उद्धव ठाकरेंची 'जनसंवाद यात्रा'

येथे क्लिक करा