Shivsena UBT News : चंद्रकांत खैरेंचे 'मविआ'च्या विजयासाठी तुळजाभवानीला साकडे...

Sachin Waghmare

उमेदवारांना दर्शनाची घाई

मराठवाडा आणि महाराष्ट्रातील लोकसभेचा पाचवा टप्पा पार पडला. त्यानंतर सर्वजण देवदर्शन करीत आहेत.

Chandrakant Khiare | Sarkarnama

देवदर्शनावर भर

संभाजीनगरचे ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे अशी अनेक मंडळी सध्या देवदर्शन करतांना दिसत आहेत.

Chandrakant Khiare | Sarkarnama

तीनही पक्षांनी विजयाचा दावा

लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात तीनही पक्षांनी विजयाचा दावा केला आहे.

Chandrakant Khiare | Sarkarnama

तुळजाभवानी मातेचे घेतले दर्शन

चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले.

Chandrakant Khiare | Sarkarnama

मविआच्या विजयासाठी साकडे

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार विजयी होऊ दे, असे साकडे घातले

Chandrakant Khiare | Sarkarnama

खणा-नारळाने ओटी भरण्याचा संकल्प

तुझी खणा-नारळाने ओटी भरीन, असा संकल्प खैरे यांनी केला.

Chandrakant Khiare | Sarkarnama

मातेची विधिवत पूजा

तुळजाभवानी मातेची विधिवत पूजा करून खैरेंनी माथा टेकला.

Chandrakant Khiare | Sarkarnama

जागरण गोंधळ घालणार

तुळजाभवानी मातेने यश दिले तर खणा नारळाने ओटी भरू जागरण गोंधळ घालू, असे साकडे खैरे यांनी यावेळी घातले.

Chandrakant Khiare | Sarkarnama

शिवसैनिकांची हजेरी

तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी मोठया संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

Chandrakant Khiare

Next : पॉलीग्राफ, नार्को टेस्टची तयारी..! केजरीवालांना आव्हान देणारी स्वाती मालीवाल यांची विधाने...