Vijaykumar Dudhale
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने राज्यातील सहा महसुली विभागात शतक महोत्सवी विभागीय नाट्य संमेलने आयोजित केली आहेत. त्यातील सोलापुरात आयोजित शतक महोत्सवी विभागीय नाट्य संमेलनाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले.
नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, आमदार सुभाष देशमुख, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, शिवाजीराव सावंत यांची प्रमुख उपस्थिती नाट्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला होती. ज्येष्ठ रंगकर्मींचा या वेळी सन्मान करण्यात आला.
सोलापुरातील विभागीय नाट्य संमेलनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार होते. मात्र, ते ऐनवेळी येऊ शकले नाहीत, त्यामुळे पालकमंत्री चंद्रकांतदादांनी फडणवीसांचे काम केले.
जुळे सोलापूर येथे नाट्यप्रेमी आणि रंगकर्मींसाठी अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त नाट्यगृह उभारण्यात येणार आहे, अशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या उद्घाटनाच्या भाषणात केली.
जुळे सोलापूर येथे अत्याधुनिक नाट्यगृह उभारण्यासाठी दहा कोटी रुपये देण्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली
विभागीय नाट्य संमेलनाची सुरुवात शनिवारी सकाळी भव्य नाट्य दिंडीने झाली. या नाट्य दिंडीला सोलापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
आमदार सुभाष देशमुख, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, मोहन जोशी, यांच्यासह अनेक दिग्गज अभिनेते, अभिनेत्री या संमेलनासाठी सिद्धेश्वरनगरीत उपस्थित होते.
नाट्य रसिकांनी पुढच्या पिढीला नाटकाची गोडी लागावी, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी व्यक्त केली.
IAS-IPS अधिकाऱ्यांचे केडर कसे ठरवले जाते ? जाणून घ्या...!