Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील; पोलिस हवालदार ते केंद्रीय मंत्री

Vijaykumar Dudhale

मूळचे जळगावचे

चंद्रकांत रघुनाथ पाटील ऊर्फ सी. आर. पाटील हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील पिंपरी आक्राउट येथील आहेत. पाटील कुटुंबीय पुढे गुजरातला स्थलांरित झाले.

Chandrakant Patil | Sarkarnama

हवालदार

वडिलांप्रमाणेच चंद्रकांत पाटील हे गुजरात पोलिस दलात भरती झाले होते. मात्र, पोलिस दलात असताना त्यांनी संघटना स्थापन केल्यामुळे त्यांना पोलिस हवालदार पदावरून निलंबित करण्यात आले होते.

Chandrakant Patil | Sarkarnama

भारतीय जनता पक्षात 1989 मध्ये प्रवेश

अटलबिहारी वाजपेयी यांच्या उपस्थितीत चंद्रकांत पाटील यांनी 1989 मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. सी. आर. पाटील यांनी सुरुवातीच्या काळात खजिनदार आणि सुरत शहर उपाध्यक्ष म्हणून काम केले.

Chandrakant Patil | Sarkarnama

नवसारीतून खासदार

नवसरी लोकसभा मतदारसंघातून चंद्रकांत पाटील हे 2009 मध्ये लोकसभेवर निवडू आले. 2014, 2019 आणि 2024 या तीन निवडणुकांत चंद्रकांत पाटील हे चढत्या मताधिक्क्याने निवडून आले. या निवडणुकीत ते तब्बल सात लाख ७३ हजार ५५१ मतांच्या फरकाने विजयी झाले

Chandrakant Patil | Sarkarnama

नरेंद्र मोदी यांची पाठराख

गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशूभाई पटेल आणि नरेंद्र मोदी यांच्यातील पक्षांतर्गत वादात चंद्रकांत पाटील हे कायम मोदी यांच्या पाठीशी उभे राहिले.

Chandrakant Patil | Sarkarnama

गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष

चंद्रकांत पाटील हे 2020 पासून गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. हे पद भूषविणारे पाटील हे पहिले गैर गुजराती व्यक्ती ठरले आहेत.

Chandrakant Patil | Sarkarnama

विधानसभा निवडणुकीत दीडशे प्लस आणले अस्तित्वात

चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपने 2022 गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत तब्बल 156 जिंकल्या होत्या. भाजपने प्रथमच एवढे मोठे भव्य यश मिळविले होते.

Chandrakant Patil | Sarkarnama

केंद्रीय मंत्री

लोकसभा निवडणुकीत दहा लाख 31 हजार 065 मते घेणारे मोदींचे निष्ठावंत चंद्रकांत पाटील यांची केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागली आहे.

Chandrakant Patil | Sarkarnama

कोण आहेत चंद्रशेखर आझाद...

Chandrashekhar Azad | Sarkarnama