स्कॉर्पिओवर 'इलेक्शन ऑन ड्यूटी'चा लोगो अन् छातीत गोळ्या; सुवेंदू अधिकारींच्या 'पीए'च्या हत्येचे भयानक PHOTO आले समोर

Jagdish Patil

हिंसाचार

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेक हिंसाचाराच्या घटना समोर येत आहेत.

Chandranath Rath Murder | Sarkarnama

चंद्रनाथ रथ

अशाच एका घटनेत भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार सुवेंदू अधिकारींचे पीए चंद्रनाथ रथ हे हिंसेचे शिकार ठरलेत.

Chandranath Rath Murder | Sarkarnama

हत्या

चंद्रनाथ रथ यांची मध्यमग्राममधील जेसोर रोडवर दोहरिया येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

Chandranath Rath Murder | Sarkarnama

फोटो

या हत्येमुळे बंगालमध्ये खळबळ उडाली आहे. तर हत्या झालेल्या घटनास्थळाचे भयानक फोटो आता समोर आले आहेत.

Chandranath Rath Murder | Sarkarnama

नुकसान

दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी चंद्रनाथ यांच्या स्कॉर्पिओवर केलेल्या गोळीबारात कारचं मोठं नुकसान झाल्याचं फोटोत दिसत आहे.

Chandranath Rath Murder | Sarkarnama

हल्लेखोर

हल्लेखोरांनी आधी विंडशील्डवर आणि त्यानंतर पुढच्या सीटवर बसलेल्या चंद्रनाथ यांच्यावर गोळ्या झाडल्याचं सांगितलं जात आहे.

Chandranath Rath Murder | Sarkarnama

गोळीबार

चंद्रनाथ स्कॉर्पिओतून जात असताना त्यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केला.

Chandranath Rath Murder | Sarkarnama

मृत्यू

हल्लेखोरांनी चंद्रनाथ यांच्या डोक्यासह छातीत गोळ्या झाडल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Chandranath Rath Murder | Sarkarnama

'इलेक्शन ऑन ड्यूटी'

चंद्रनाथ यांच्या स्कॉर्पिओवर 'इलेक्शन ऑन ड्यूटी'चा लोगो लावल्याचंही या फोटोंमध्ये दिसत आहे.

Chandranath Rath Murder | Sarkarnama

निकटवर्तीय

चंद्रनाथ हे सुवेंदु अधिकारी यांचे निकटवर्तीय होते. शिवाय ते त्यांचे खासजी सचिवही होते.

Chandranath Rath Murder | Sarkarnama

आरोप

तर ही हत्या पूर्वनियोजित होती, यामागे तृणमूल हात असल्याचा आरोप भाजपचे नेते अर्जून सिंह यांनी केला.

Chandranath Rath Murder | Sarkarnama

NEXT : ममतांचे विश्वासू सहकारी ते भाजपचा CM पदाचा चेहरा, सुवेंदू अधिकारींची हिस्ट्री...

Suvendu Adhikari
क्लिक करा