Dr.Chandra Sekhar Pemmasani : यंदा लोकसभा निवडणुकीत आतापर्यंतचे सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी!

Mayur Ratnaparkhe

यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील आतापर्यंतचे सर्वाधिक श्रीमंत उमेदवार डॉ चंद्र शेखर पेम्मासानी ठरले आहेत.

पेम्मासानी यांनी आंध्र प्रदेशातील गुंटूर लोकसभा मतदारसंघातून तेलुगू देसम पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी तब्बल 5,785.28 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे.

यामुळे पेम्मासानी चंद्र शेखर हे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत आतापर्यंतचे सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. 

त्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेले प्रतिज्ञापत्र 37 पानांचे आहे.

पेम्मासानी चंद्र शेखर हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. 

22 एप्रिल रोजी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. 

डॉ. पेम्मासानी 2014 पासून गुंटूरमधून तिकीट मागत होते.

पेम्मासानी यांनी EAMCET मध्ये 27 वा क्रमांक मिळवला आणि उस्मानिया विद्यापीठातून एमबीबीएस केले. 

NEXT : अकोल्यातील अमित शहांच्या भाषणातील दहा मुद्दे