Aslam Shanedivan
सातबारा उताऱ्यावरील जुन्या, कालबाह्य आणि निरुपयोगी नोंदींमुळे राज्यातील शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी निर्माण होत होत्या.
पण महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार ‘जिवंत सातबारा मोहिमेच्या’ दुसऱ्या टप्प्याला राज्यभर सुरूवात करण्यात आली आहे
या मोहिमेचा मुख्य उद्देश हा सातबारा उताऱ्यांवरील कालबाह्य नोंदी, मृत खातेदारांची नावे कमी करून कायदेशीर वारसांची नोंद करणे आणि जमीन नोंदी अधिक अचूक व स्पष्ट करणे हा आहे.
त्याप्रमाणे तलाठ्यांना फेरफार नोंदी तपासून जुने बोजे, शेरे आणि निरुपयोगी मजकूर कमी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
महसूल विभागाने पहिल्या टप्प्यातील अवघ्या आठ दिवसांत आठ लाखांहून अधिक सातबारा उताऱ्यांवर वारस नोंदी पूर्ण करण्यात आल्या आहेत.
संपूर्ण राज्यात एकूण 22 लाख सातबारा उतारे अद्ययावत करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले असून मोहिमेअंतर्गत प्रत्येक गावात किमान 50 उताऱ्यांवर याचे काम केले जाईल
या सुधारित नोंदीमुळे मृत खातेदारांची नावे वगळून नव्या वारसांची नोंद केल्याने जमिनीबाबतचा गोंधळ कमी होणार असून,भविष्यात कायदेशीर वाद टाळता येणार आहेत.