UPSC Exame : गुन्हा दाखल झाला तरी नो टेन्शन! UPSC सह स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना मोठा दिलासा

Aslam Shanedivan

स्पर्धा परीक्षा

सध्या आपल्याकडे सरकारी नोकऱ्यांसाठी धडपडणाऱ्यांची संख्या अधिक असून लाखो तरुण यूपीएससीसह केंद्रीय परीक्षा, एसएससीसह बँका आणि पोलिस भरतीसाठी तयारी करताना दिसतात

Competitive Examination | sarkarnama

एफआयआर

पण स्पर्धा परीक्षा देताना उमेदवारांवर जर एफआयआर किंवा कोर्ट केस झाल्याने नोकरी मिळू शकणार नाही असे म्हटले जाते. पण हे सत्य आहे का याबाबत थोडसे...

Competitive Examination | sarkarnama

केंद्र सरकार आणि न्यायालय

उमेदवाराविरोधात गुन्हा (FIR) दाखल झाल्यामुळे सरकारी नोकरीपासून रोखता येत नाही, असा स्पष्ट संदेश केंद्र सरकार आणि न्यायालयांनी दिला आहे.

Competitive Examination | sarkarnama

मार्गदर्शक तत्त्व

तर एफआयआर दाखल होणे म्हणजे दोष सिद्ध होणे नव्हे, त्यामुळे केवळ एफआयआरच्या आधारावर उमेदवाराला अपात्र ठरवू नये, असे धोरण मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद आहे.

Competitive Examination | sarkarnama

नियम काय?

कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या (डीओपीटी) २०१६ आणि २०२० च्या नियमांनुसार, इंडियन पीनल कोडच्या किरकोळ कलमांखाली एफआयआर दाखल असल्यास उमेदवाराला अपात्र ठरवता येत नाही.

Competitive Examination | sarkarnama

कोणती प्रकरणे?

ज्यात रस्ते अपघात, शेजाऱ्यांशी वाद, किरकोळ भांडण यांसारख्या प्रकरणांत पोलिस पडताळणीदरम्यान केवळ प्रकरणाची स्थिती विचारली जाते आणि स्पष्टीकरण नोंदवले जाते. तर कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता नसल्याचेही म्हटले आहे.

Competitive Examination | sarkarnama

गंभीर गुन्हे कोणते?

पण खून, बलात्कार, दरोडा, पॉक्सो, एनडीपीएस, दहशतवाद, भ्रष्टाचार किंवा लाचखोरी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये एफआयआर दाखल असेल तर सरकारी नोकरी मिळत नाही. सर्वोच्च न्यायालयानेही तसे आदेश दिले आहेत.

Competitive Examination | sarkarnama

उमेदवारी रद्द

किरकोळ कलमांखाली चालू असलेल्या खटल्यांमध्ये किंवा न्यायालयाने उमेदवाराला निर्दोष ठरवल्यास सरकारी नोकरी मिळण्याची संधी कायम असते. मात्र, संशयाच्या आधारे मिळालेल्या निर्दोष मुक्ततेच्या प्रकरणांमध्ये उमेदवारी रद्द होऊ शकते.

Competitive Examination | sarkarnama

पोलिस पडताळणी

नोकरीपूर्वीच्या पोलिस पडताळणीत उमेदवाराचा चारित्र्य अहवाल महत्वाचा असून तो सरकारी नोकरीसाठी महत्वाचा असतो.

Competitive Examination | sarkarnama

आधी बाबरी मशिदीची पायाभरणी, आता ममतादादींची सत्ता उखडण्याचा प्लॅन

आणखी पाहा