सरकारनामा ब्यूरो
2012 बॅचचे आयएएस अधिकारी पुष्पेंद्रकुमार मीना हे छत्तीसगडच्या दुर्ग भागात कलेक्टर म्हणून कार्यरत आहेत.
यापूर्वी त्यांनी तेथील कोंडागावच्याही कलेक्टर पदावर काम केले आहे.
पोस्टिंग झालेल्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी नव्या प्रकारची प्रगती घडवली असा त्यांचा आत्तापर्यंतचा इतिहास आहे.
डिजिटल शिक्षणातील बदल घडवण्यात त्यांची विशेष रुची आहे.
15 महिने महासमुंदचे तंत्रशिक्षण संचालक तसेच जिल्हा पंचायत सीईओ या जबाबदाऱ्याही त्यांनी सांभाळल्या आहेत.
बस्तरला पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी पुढाकार घेत आणि त्यासाठी त्यांनी खूप कामही केले आहे.
बस्तरमधील लोक दूधदुभती जनावरे पाळत नाहीत. मात्र, त्यांनी तेथील लोकांना डेअरी फार्मची योजना देऊन या कल्पनेला प्रोत्साहन दिले.
शैक्षणिक हब म्हणून ओळखला जाणाऱ्या दुर्ग जिल्ह्यातील भिलाई परिसरातही अनेक विकासकामे यशस्वीरित्या ते पार पाडत आहेत.
R