सरकारनामा ब्यूरो
सुमारे 9,000 कोटी रुपये खर्चून बांधल्या जाणाऱ्या या फ्लायओव्हर एक्स्प्रेस वेचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन झाले.
एक्स्प्रेस वेचा 19 किलोमीटर भाग हा हरियाणामध्ये येतो, तर उर्वरित 10 किलोमीटरचा भाग दिल्लीत आहे.
अत्याधुनिक यंत्रणा असलेला या एक्स्प्रेस वेची टोलवसुली आणि संपूर्ण सुरक्षा यंत्रणा स्वयंचलित असेल.
दिल्लीच्या गुरुग्राम एक्स्प्रेस वेवरील शिवमूर्तीपासून सुरू झालेला हा मार्ग बसईच्या द्वारका सेक्टर 21 मधून खेरकी दौला टोल प्लाझाजवळ संपतो.
एक्स्प्रेस वेमधील बोगद्याद्वारे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाला या रोडची पर्यायी जोडणी असणार आहे.
दिल्लीच्या द्वारका सेक्टर 25 मधील आगामी इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर (IICC) मध्ये या रोडद्वारे थेट प्रवेश मिळणार आहे.
9 किलोमीटर लांबीचा 34 मीटर रुंद आणि आठ लेनचा एका खांबावरील हा देशातील पहिलाच रोड असणार आहे.
बोगदे, 8 ग्रेडचा रोड सेक्शन, एलिव्हेटेड फ्लायओव्हर आणि अपर फ्लायओव्हर अशा चार सेक्शनचा यात समावेश असणार आहे.
R