तुमच्या PAN कार्डवर कुणी लोन घेतलंय का? काही सेकंदांत तपासा!

Rashmi Mane

आजच तपासा!

आजकाल लोन फ्रॉड आणि Identity Theft प्रकार वाढलेत. तुमच्या PAN कार्डचा गैरवापर होऊ नये यासाठी सावध राहा!

Pan Card | Sarkarnama

PAN कार्ड का आहे धोक्यात?

PAN कार्ड थेट तुमच्या क्रेडिट स्कोरशी जोडलेलं असतं. त्यामुळे कुणी फसवणूक करून लोन घेतलं तर तुमचा क्रेडिट स्कोर खराब होऊ शकतो.

Pan Card | Sarkarnama

कसे बघाल PAN वर फ्रॉड झाला आहे का?

तुमची क्रेडिट रिपोर्ट नियमित तपासा. यात तुमच्या नावावर घेतलेले लोन, क्रेडिट कार्ड यांची माहिती असते.

Pan Card | Sarkarnama

कुठून तपासाल क्रेडिट रिपोर्ट?

CIBIL, Experian, Equifax, CRIF High Mark यांच्या वेबसाईटवर जाऊन मोफत रिपोर्ट डाउनलोड करता येतो. PAN आणि मोबाईल नंबरने व्हेरिफाय करा.

Pan Card | Sarkarnama

रिपोर्ट तपासताना काय पाहाल?

रिपोर्ट तपासतांना ओळखीचं नसलेलं लोन, अनोळखी बँकेचं नाव, हार्ड इन्क्वायरी (ज्या तुम्ही केल्या नाहीत) हे सगळे फसवणुकीचे संकेत आहेत.

Pan Card | Sarkarnama

फसवणूक आढळली तर काय कराल?

फसवणूक आढळली तर त्या बँकेला किंवा लेंडरला कळवा. क्रेडिट ब्युरोला तक्रार करा (Online dispute नोंदवा). पोलीस सायबर क्राइम सेलमध्ये FIR नोंदवा.

PAN Card

PAN चा गैरवापर कसा टाळाल?

PAN नंबर WhatsApp, सोशल मीडियावर शेअर करू नका. असुरक्षित वेबसाईटवर टाकू नका आणि PAN हरवल्यास लगेच डुप्लिकेटसाठी अर्ज करा.

Pan Card

आणखी कोणती काळजी घ्याल?

बँकिंग अकाउंट्ससाठी मजबूत पासवर्ड वापरा तसेच SMS/Email अलर्ट ऑन ठेवा.
महिन्याला रिपोर्ट तपासत राहा.

Pan Card

Next : 1 ऑगस्टपासून बदलणार 6 मोठे नियम; क्रेडिट कार्ड, UPI, LPGवर होणार मोठा परिणाम!

येथे क्लिक करा