Mayur Ratnaparkhe
'राज्य सरकारकडून ओबीसींवर अन्याय केला जात आहे.' असा छगन भुजबळांनी पत्रकारपरिषदेत आरोप केला आहे.(सर्व फोटो- संग्रहीत)
एकीकडे सांगायचं ओबीसींना धक्का लागणार नाही आणि दुसरीकडे कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. असं भुजबळ म्हणाले.
मराठा समाजाला आरक्षण देताना त्यांचा ओबीसीमधून आरक्षणाचा हट्ट धरण्यात आला आहे
राज्य सरकारकडून ओबीसीमध्ये मराठा समाजाला घुसविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
येत्या काळात ओबीसींची राज्यभर यात्रा काढणार आहे.असं जाहीर केलं.
या आरक्षण बचाव रॅलीला १ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे, असं भुजबळांनी सांगितलं.
कुणबी प्रमाणपत्र वाटपास स्थगिती द्यावी. अशी मागणीही भुजबळांनी केली आहे.
सगेसोयऱ्याच्या मुद्द्यावर हरकती घेणार आहोत. असं भुजबळांनी जाहीरपणे सांगितलं आहे.
मराठा आरक्षणाची अधिसूचना रद्द करा, अशी मोठी मागणी भुजबळांनी पत्रकारपरिषदेत केली.