Roshan More
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर छगन भुजबळांनी अजित पवारांना साथ दिली. छगन भुजबळ अजित पवारांसोबत महायुतीत सहभागी झाले.
भुजबळ महायुतीत असले तरी महायुतीच्या विरोधात आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना पाठींबा देणारी वक्तव्य ते करत आहेत.
बाबासाहेबांच्या प्रतिमेची विटंबनेवरून जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात भाजप आंदोलन केले. पण भुजबळांनी आव्हाडांचा पाठराखण केली.
मंत्रीमंडाळातचे आपले सहकारी शिक्षमंत्री दीपक केसकर यांना मनुस्मृतीचा चंचूप्रवेश देखील शालेय पाठ्यपुस्तकात होता कामा नये, असे सुनावले
निवडणुकीत उद्धव ठाकरे, शरद पवार यांना सहानुभूती आहे, असे भुजबळ म्हणाले.
महायुतीचा जागा वाटप ठरवण्याआधीच भुजबळांनी राष्ट्रवादीसाठी (अजित पवार गट) 80 ते 90 जागा देण्याची मागणी केली.
जागा वाटपावरून भुजबळांना समज देण्याची मागणी भाजप नेते करत आहेत. त्यावर "काय समज द्या, समज द्या लावलंय, मी माझ्या पक्षात बोलणारच" अशी ठाम भूमिका भुजबळांनी घेतली आहे.