Ganesh Sonawane
महाराष्ट्र सदन घोटाळ्यानंतर कलिना लायब्ररी हे छगन भुजबळांवरील शेवटचे मोठे प्रकरण होते.
आता कलिना ग्रंथालय प्रकरणात मुंबईतील विशेष सत्र न्यायालयाने मंत्री छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता केली आहे.
तब्बल दहा वर्षानंतर कोर्टाने या खटल्याचा निकाल दिला. भुजबळांना पुराव्यांअभावी दोषमुक्त केलं.
त्यामुळे भुजबळांवरील सर्व प्रमुख भ्रष्टाचाराचे खटले आता कायदेशीररीत्या संपुष्टात आले आहेत.
एसीबीच्या सर्व प्रकणांतून भुजबळांची सुटका झाली असून, दशकभरापासून सुरु असलेल्या कायदेशीर लढ्यांना पूर्णविराम मिळाला आहे.
सर्व कायदेशीर प्रकरणातून निर्दोष सुटका झाल्याने भुजबळांवरील नैतिक बंधने संपुष्टात आली आहेत.
त्यामुळे आता सत्तेतील निर्णयप्रक्रियेत आणि पक्षांतर्गत समीकरणांत त्यांचा थेट प्रभाव वाढणार आहे.
न्यायालयीन डाग पुसले गेल्याने राज्यातील आक्रमक ओबीसी चेहरा म्हणून भुजबळ आता अधिक निर्विवादपणे आणि आक्रमक भूमकेत मैदानात उतरतील.