Roshan More
बहुजन समाजाचे नेतृत्त्व करण्यासाठी एका सक्षम पुढाऱ्याची गरज आहे, असे त्यांचे मत होते. त्यामुळे त्यांनी बहुजनांच्या नेत्याचा शोध सुरू होता.
डॉ. बाबासाहेबांची आणि शाहू महाराजांची ओळख 1919 साली झाली होती. बहुजन समाजातून एक तरुण उच्चविद्या संपादून डॉक्टरेट झाला याची माहिती मिळताच शाहू महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शोध घेत स्वतः बाबासाहेब राहत असणाऱ्या परळच्या चाळीत गेले. तेथे बाबासाहेब आणि त्यांची भेट झाली.
याचवेळी महाराजांनी बाबासाहेबांना कोल्हापूर भेटीचे आमंत्रण दिले. कोल्हापूरला डॉ. बाबासाहेबांचे आगमन झाले. त्यावेळी त्यांची मिरवणूक काढली आणि त्यांना एका भव्य समारंभात 'मानाचा' जरीपटका बांधून त्यांचा सत्कारही केला.
डॉ. आंबेडकरांची चळवळ जोमाने सुरू व्हावी, यासाठी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'मूकनायक' या वार्तापत्रास 2500 रुपयांची भरघोस मदतही शाहू महाराजांनी दिली. त्यानंतर अनेकदा महाराज आणि बाबासाहेबांचा संबंध येत गेला.
1920 सालच्या माणगाव परिषदेचे अध्यक्षपद बाबासाहेब आंबेडकर यांना देण्यात आले. यावेळी भाषणात महाराजांनी 'एक वेळ अशी येईल की बाबासाहेब सर्व हिंदुस्थानाचे पुढारी होतील.', असे काळाच्या कसोटीवर उतरणारे उद्गार काढले होते.
बाबासाहेब आंबेडकर अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी 1920 मध्ये लंडनला गेले. तेव्हा त्यांच्या उच्च शिक्षणासाठी शाहू महाराजांनी आर्थिक मदत केली.
बाबासाहेब आंबेडकर यांनी 1927 मध्ये ‘बहिष्कृत भारत’मधील अग्रलेखात शाहू महाराजांसारखा मित्र अस्पृश्यांना पूर्वी कधीही मिळाला नव्हता, असे म्हटले.