Rashmi Mane
शाहू महाराजांची दुरदृष्टी आणि लोकहितकारी धोरणांची सुरुवात.
अन्नधान्याच्या किंमती गगनाला भिडल्या होत्या. गरिबीमुळे जनतेची उपासमारीची वेळ आली होती.
जनतेची दुःस्थिती पाहून शाहू महाराजांनी गंभीर पावले उचलली. स्वस्त दरात अन्न मिळावे यासाठी ठोस उपाययोजना आखली.
महाराजांनी व्यापाऱ्यांना बोलावले, "ना नफा ना तोटा" तत्त्वावर धान्य विक्रीचे आवाहन केले.
"तुमचा तोटा संस्थान भरेल" असे आश्वासन दिले. म्हणूनच 1897 च्या महागाईनंतर 1898मध्ये दर स्थिर राहिले.
त्यामुळेच कोल्हापुरात पहिले स्वस्त धान्य दुकान सुरू झाले.
व्यापाऱ्यांना आर्थिक मदत देऊन धान्य खरेदीची सुविधा. म्हैसूरसारख्या संस्थानातूनही धान्य आयात करण्यात आले.
या उपक्रमांमुळे उपासमारीपासून हजारो लोक वाचले. शेतकरी-शेतमजुरांना अन्नधान्य सहज मिळाले.
शाहू महाराजांचे धोरण आजही प्रेरणादायी! ‘जनतेसाठी राजा’ या मूल्याची साक्ष देणारा ऐतिहासिक निर्णय.