Aslam Shanedivan
आज (19 फेब्रुवारी) शिवजयंती असून शिवभक्त एखादा गडकिल्ल्यावर जाऊन राजांना अभिवादन करतात. पण आपल्या राज्यात अशी एक चिमुकली आहे. जीने अनेक किल्ले सर केले आहेत.
तिचं अवघं वय 7 वर्ष असून तिचे नाव शर्विका म्हात्रे आहे. तिने आतापर्यंत तिने 121 किल्ले सर केले आहेत.
तर शिवाजी महाराजांचे नाव ऐकून वेगळीच ऊर्जा मिळत असल्यानेच सह्याद्रीच्या कुशीतल्या 121 किल्ल्यांवर झेंडा रोवला आहे
शर्विका जितेन म्हात्रे महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर सर करणारी सर्वात लहान गिर्यारोहक आहे.
'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड', 'आशिया बुक ऑफ रेकॉर्ड', 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड', 'डायमंड बुक ऑफ रेकॉर्ड' आणि 'ओएमजी बुक ऑफ रेकॉर्ड' मध्ये तिचे नाव आले आहे
शर्विकानं कलावंतीण सुळका किल्ला सर केला आहे. असे करणारी ती महाराष्ट्रातील पहिली मुलगी ठरली आहे.
वयाच्या सातव्या वर्षात तिने राजगड, रायगड, तोरणा, सिंहगडसह सर्वात कठीण आणि सर्वाधिक गिरिदुर्ग असे तब्बल 121 किल्ले यशस्वीपणे सर केले.
शर्विकाचे आई-वडील गिर्यारोहक असल्याने तिलाही यात आवड निर्माण झाली आहे.
तिचे स्वप्न रॉक क्लाईंबिंगमध्ये देशाचं प्रतिनिधित्व करण्याचे आहे.