Pradeep Pendhare
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अहिल्यानगरमधील पुतळ्यासमोर महिला शिवप्रेमींनी जयंतींच्या पूर्वसंध्येला एकत्र येत दीपोत्सवाने मानवंदना दिली.
पद्मश्री डॉ . विठ्ठलराव विखे पाटील कारखाना कार्यस्थळावर पालकमंत्री राधाकृष्ण विखेंनी शिवकालीन शस्त्रांचं पूजन केलं.
विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी मुंबईतील विधान भवन परिसरातील सिंहासनाधिष्ठीत शिवाजी महाराज पुतळ्यास अभिवादन केले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डाॅ. सुधीर तांबे यांनी संगमनेर इथं अभिवादन केले.
शिर्डी इथं सुजय विखेंकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन.
आयुक्त यशवंत डांगे यांनी अहिल्यानगर महापालिकेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अधिकाऱ्यांसमवेत अभिवादन केले.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्ताने अहिल्यानगर शहरात 'जय छत्रपती शिवाजी जय भारत' पदयात्रा काढण्यात आली.
जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.