Jagdish Patil
देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांची 395 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे.
'शिवजयंती'निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेल्या शिवनेरीवर शिवजन्मोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आलं आहे.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते.
यावेळी महिला भगिनींनी पारंपारिक पाळणा गाऊन शिवजन्मोत्सव साजरा केला.
यावेळी विविध संस्थांच्या वतीने शिवकालीन शस्त्रास्त्रांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी किल्ल्यांच्या परिसरामध्ये सरकार अतिक्रमण होऊ देणार नाही आणि जी केली आहेत ती सुद्धा काढून टाकली जातील, असं आश्वासन दिलं.
तर "महाराजांचे गडकोट हे त्यांनी आणि हजारो मावळ्यांनी दाखवलेल्या पराक्रमाची साक्ष देतात"; असं एकनाथ शिंदे म्हणाले.